कुडाळ तालुक्यातील नवीन तलाठी सजा व मंडळ कार्यालयांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन
कुडाळ /-
कुडाळ तालुका भौगोलिक, महसूलदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा तालुका आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून जिल्ह्यातील नवीन 59 तलाठी सजांपैकी एकट्या कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 23 तलाठी सजांची तसेच 4 महसुली मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे. या नवीन तलाठी सजा व महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आल्याने या गावांमधील नागरिकांना आता सातबारा व इतर कामे गावातच करणे सोयीची होणार आहेत. या सर्व नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असे प्रतिपादन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील नवीन तलाठी सजा व मंडळ अधिकारी कार्यालयांचे उदघाटन मंगळवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रथमतः हुमरमळा (वालावल) येथे नवनिर्वाचित तलाठी कार्यालयाचे उदघाटन झाले त्यानंतर माड्याची वाडी (मडगाव) येथे मंडळ कार्यालय,झाराप येथे मंडळ कार्यालय,कट्टागाव (माणगाव) येथ तलाठी कार्यालय, नमसगाव (माणगाव) येथे तलाठी कार्यालय,ओरोस येथे मंडळ कार्यालय,व कुंदे येथे तलाठी कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
हुमरमळा येथे उदघाटनाप्रसंगी बोलताना आ.नाईक म्हणाले, तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे. या नवीन तलाठी सजा व मंडळांची निर्मिती करण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचेही योगदान आहे. या तलाठी सजा व मंडळांच्या निर्मितीमुळे या गावांमधील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यात संगणकीय सातबाराचेही काम प्रगतीपथावर आहे. मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया थांबली आहे. हा प्रश्न सुटल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी पदाची भरती करून स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आ.नाईक यांनी यावेळी दिली. तसेच तोपर्यंत ज्या तलाठ्यांवर या सजांचा कार्यभार देण्यात आला आहे त्यांनी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस या गावांसाठी तलाठी सजामध्ये उपस्थित राहावे अशी सूचना त्यांनी केली. हुमरमळा ग्रा.पं., अतुल बंगे व ग्रामसेविका यांच्या कामाचे कौतुक करीत यापुढील काळात देखील या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आ.नाईक यांनी दिली.
सभापती सौ.नुतन आईर व उपसभापती जयभारत पालव यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त करीत ग्रा.पं. तसेच बंगे यांच्या कार्याचे कौतुक केले. तहसीलदार श्री पाठक यांनी या नवीन तलाठी सजांना स्वतंत्र तलाठी मिळेपर्यंत अन्य तलाठ्यांकडे कार्यभार देऊन नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल असे आश्वासन दिले. अतुल बंगे यांनी प्रस्तावित केले.
हुमरमळा (वालावल) येथे शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, हुमरमळा सरपंच सौ.अर्चना बंगे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी सरपंच सुरेश वालावलकर, प्रविण मार्गी, मंडळ अधिकारी एस.पी.गुरखे, तलाठी पी.एस.सलगर, पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक शाहू गुजर, ग्रामसेविका अपर्णा पाटील, अमृत देसाई, माजी उपसभापती बबन बोभाटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, उपविभाग प्रमुख मितेश वालावलकर, स्नेहलदीप सामंत, नितीन सावंत, दिपक आंगणे, राजू गवंडे, पोलिस पाटील उमेश शृंगारे, भूपेश चेंदवणकर, प्रशांत तेंडोलकर, सुयोग ढवण आदींसह पंचक्रोशीतील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
माड्याचीवाडी (मडगाव) येथे जि.प.सदस्या वर्षा कुडाळकर, शीतल परब, संदीप राऊळ, सुभाष परब, तलाठी सुषमा गायकवाड, ग्रामसेवक एम.एस.शेडगे, पोलिस पाटील चंद्रशेखर परब, बाळू परब, सचिन गावडे, संदिप वारंग,संभाजी गावडे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
झाराप येथे उपसरपंच अजित मांजरेकर,तलाठी पिटर लोबो,ग्रामसेविका श्रध्दा आडेलकर, प्रभाकर मेस्त्री, संजीवनी पेंडूरकर, तुकाराम गोडे, अशफाक कुडाळकर,सोहेल जद्दी, विष्णू माणगांवकर,विजय वराडकर, चंदू मुंडले,
ओरोस येथे सरपंच प्रीती देसाई, उपसरपंच मनाली परब, मंडळ अधिकारी संदीप हांगे,तलाठी काटे, प्रकाश जैतापकर, नागेश ओरोसकर, छोटू पारकर, बबन सावंत, अमित भोगले, मनस्वी परब, प्रकाश ओरोसकर, रवी कदम, रमाकांत परब,
माणगांव येथे जि.प.सदस्य राजू कविटकर,माजी उपसभापती श्रेया परब, पं स.सदस्य शरूयु घाडी मथुरा राऊळ, विभागप्रमुख बबन बोभाटे,ग्रा.प सदस्य वैभव परब, दीपक नानचे, सौ भोसले, सुनील सावंत,युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी,गुरुनाथ माणगावकर,नानेली सरपंच प्रज्ञेश धुरी,परशुराम घाडी,संजय धुरी,बाळा जोशी,साईनाथ नार्वेकर,रुपेश नानचे, रामचंद्र धुरी, उपस्थित होते.याप्रसंगी माणगांव ग्रा.प चे ग्रामविस्तार अधिकारी श्री कोलते यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कुंदे येथे उपतालुकाप्रमुख महेश सावंत, सरपंच सचिन कदम, उपसरपंच सुशील परब, विभागप्रमुख विकास राऊळ, प्रवीण भोगटे, आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित होते.