✍🏼लोकसंवाद/- कुडाळ.

पावशी येथे सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात आले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. संबंधित अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा ताटकळत राहावे लागले. जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा पावशी ग्रामस्थांनी घेतला. पावशी येथील सर्विस रस्ता व बस शेड बांधकामास मंजुरी मिळण्याकरिता हे जना आंदोलन छेडण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आंदोलकारांना बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जोपर्यंत अधिकारी तिथे येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. पावशी येथील बावस्करवाडी, खोतवाडी, भटवाडी, मेस्त्रीवाडी भोगटेवाडी येथील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. कामानिमित्त जण्याकरिता थेट महामार्गावरून जावे लागते. मुलांना शाळा कॉलेजला जाण्याकरिता बस थांबा करिता महामार्गावर पावसात उभे राहावे लागते. त्यामुळे महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे कधीही अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. या परिस्थितीमुळे ग्रामस्थ सध्या जीव मुठीत घेऊन महामार्गावर येजा करीत आहेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सरपंच वैशाली पावसकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद खोत, शेखर पोखरे, दीपक पावसकर, शंकर पावसकर, अरुण धुरी, पंकज खोत, शेखर महेश मेस्त्री, दिव्या खोत, सूरज पावसकर, नागेश खोत, प्रकाश पावसकर, रुपेश खोत, सुयोग मेस्त्री सागर भोगटे आणि सर्व पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page