✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
दुकानगाळयांच्या वाटपाच्या वादातुन मारहाण करुन जखमी केलेचे आरोपातून ओरोस ता. कुडाळ येथील मेघराज उर्फ शशि हडकर व शरद हडकर यांची ओरोस सिंधुदुर्ग येथील मे मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तताकेली. आरोपी यांचेवतीने अॅड. यतिश खानोलकर यांनी कामकाज पाहीले.त्यांना अॅड. रोहीत उर्फ तानाजी पालव व अॅड. कोमल काकतकर यांनी सहायय केले.
प्रस्तुतची घटना दिनांक 21/02/2018 रोजी घडलेली होती. यातील आरोपी मेघराज उर्फ शशि हडकर व शरद हडकर यांनी प्रस्तुत दिवशी रात्रौ आठ चे सुमारास ओरोस बाजारपेठ येथील पत्रा मार्केट मधील गाळे न देणेचे कारणावरुन फिर्यादी मनिष पारकर यांना चाकु , एक्सो ब्लेड व लाकडी दांडयाने मारहाण करुन त्यांना जबर जखमी केले अशा आशयाची फिर्याद यांनी श्री. मनिष पारकर यांनी दिनांक 21/02/2018 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दिलेली होती.
त्यानुसार या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीसांनी आरोपी यांचेविरुदध भा.द.वि. कलम
324,504,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन व तदनंतर तपासकाम करुन सदर,कलमाखालीच आरोपी यांचेविरुदध ओरोस येथील मे.मुख्य न्यायंदडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.. सदर खटल्याची ओरोस येथील मे. मुख्य न्यायंदडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली असता सदर सुनावणीत आरोपी यांचेविरुदध कोणताही सबळ पुरावा न आढळुन आल्याने व आरोपीचे वकीलांनी मांडलेला बचाव ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
