लोकसंवाद /- वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्त होण्यासाठी जिल्हा व्यापारी संघाच्या माध्यमातून ९ डिसेंबरला जिल्हावासियांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४:०० ते ६:०० या वेळेत होणार आहे. यावेळी ओसरगाव टोल नाका हटविण्यासंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तरी या बैठकीत मोठ्या संख्येने जिल्हावासी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page