युवा कार्यकर्ते प्रसाद नार्वेकर यांची यशस्वी खेळीने माणगाव,पुळास,हळदीचे नेरूर,आंबेरी,वसोली भागातील कार्कर्त्यांचा प्रवेश.
कुडाळ /-
माणगाव खोऱ्यातील शिवसेनेच्या बालेकिल्लाला धक्का देत प्रसाद नार्वेकर यांच्या यशस्वी खेळीने बाळासाहेबांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला.आ.वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनेक कार्यकर्ते या प्रवेशात सहभागी होते यापुढेही गावागावात जाऊन बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व यांच्या माध्यमातून गावागावातून कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे
आजच्या या प्रवेशांमध्ये माणगाव पूळास हळदीचे नेरूर, नानेली, आंबेरी, वसोली, या गावातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या पुढेही संपूर्ण माणगाव खोरे पिंजून काढत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळासाहेबांच्या सेनेत आणणार असल्याची ग्वाही प्रसाद नार्वेकर यांनी दिली
यावेळी मेजर सुधीर सावंत, भैयाशेट उर्फ किरण सामंत, संजय आंग्रे, वर्षा कुडाळकर, अनुप्रती कोचरे, आजगावकर भास्कर राणे सुनील पारकर भूषण परुळेकर प्रसाद नार्वेकर संभाजी निकम, सुभाष राणे अमित केरकर, अमित कोरेगावकर, गणेश पालव, ललित बोगार, दिनेश कोरगावकर, हर्षद कळगुटकर अमित उर्फ पोलाड लाड, सागर काणेकर, वेदांत भिसे, निलेश धुरी, रुपेश तावडे, गोट्य गायचोर आदी उपस्थित होते.
