बिल्डर असोसिएशन,वाळू व्यावसायिकांनी कामगारांच्या नोंदीबाबत पुढाकार घ्यावा.;मनसेचे आवाहन..

कुडाळ /-

जिल्ह्यात इमारत बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय कामगार मजूर मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून त्यांच्याकडून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण देखील तेवढ्याच प्रमाणात लक्षवेधी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांसह मनसे शिष्टमंडळाने तत्कालीन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आंतरराज्य स्थलांतरण कायद्यातील तरतुदींप्रमाणे जिल्ह्यात कार्यरत परप्रांतीय कामगारांची नोंदणी करा, जेणेकरून गुन्ह्यांच्या तपास कामात पोलिस प्रशासनालाच त्याचा फायदा होईल अशा आशयाचे निवेदन देखील सादर केले होते.निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला नोंदणीबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र पोलीस ठाण्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच परप्रांतीय लोकांकडून मुजोरीच्या घटना जिल्ह्यात वाढीस लागल्या आहेत.

बिल्डर असोसिएशन व वाळू व्यावसायिकांनी देखील यामध्ये पुढाकार घेऊन त्यांच्याकडील कार्यालय कार्यरत मजुरांची तात्काळ नोंदणी करावी व परप्रांतीय मजुरांकडून स्थानिक गवंडी,पेटर ,फोल सिलिग, कामगारांचा रोजगार हिरावत असल्याने स्थानिकांना प्राधान्याने कामे द्यावीत. परप्रांतीयांना भाडेतत्त्वाने राहण्यासाठी जागा देणाऱ्या मालकांनी देखील भाडेकरूची पूर्ण माहिती पोलीस स्थानकांना द्यावी.येत्या महिनाभरात जिल्ह्यातील कार्यरत सर्व परप्रांतीयांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास मनसे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवेल व अशा पुवतीचा लोकाना ढेचुण काङण्यासाठि कायदा हातात घ्यावा लागेल.असा इशारा मनसेचे कुडाळ उप तालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page