कुडाळ /-
दिनांक १२/०४/२०१९ रोजी आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याची फिर्याद कुडाळ पोलीस स्थानकात देण्यात आली होती. याबाबत तपास करीत असताना संशयित आरोपी पंकज राऊळ,रा. तेंडोली ता.कुडाळ यास दिनांक ०८/०७/२०१९ रोजी अटक करून ओरोस येथील मे.सत्र न्यायालयात भा. द. वि कलम ३७६(१)(अ), ५०६,५०७ या गुन्ह्याखाली दोषारोप पत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व संशयित आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन मे सत्र न्यायाधीश यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर व ॲड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले
