ग्रामपंचायतीने त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा समस्त ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर..
कुडाळ /-
तालुक्यातील गोठोस गावांमध्ये पंधरा दिवसापूर्वी मोकाट फीरणाऱ्या कुत्र्याने रात्रीचा शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन जनावरांचा चावा घेतल्याने चार जनावरे दगावली आहेत.
ग्रामपंचायतीने त्या कुत्रांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी पंधरा दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचा ग्रामस्थांना तसेच शाळेतील मुलांना रस्त्यावरून ये जा करताना भीतीचे वातावरण संपूर्ण गावांमध्ये पसरले आहे गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात शेतकरी आटा पिटाला आले असल्याने बँकेची कर्ज घेऊन जनावरे शेतकऱ्यांनी खरेदी केली असल्याने कर्जाचा डोंगर अंगावर तोच रोजगार गेल्याने जनावरे दगावली संबंधित विभागाच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
