कुडाळ/-

मूळ बिबवणे येथील पत्रकार उत्तम शिरोडकर (४६) यांचे बुधवारी रात्री ११.४५ वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुडाळ येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपारी ३.३० वाजता त्यांच्या बिबवणे या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.उत्तम शिरोडकर हे मुळ बिबवणे येथील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६ मध्ये लोकमतमधून त्यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. २००६ ला त्यांनी प्रथम झाराप वार्ताहर म्हणून लोकमतमधून आपल्या पत्रकारितेत सुरूवात केली. यानंतर २०१२ पर्यंत कुडाळ शहर वार्ताहर म्हणून त्यांनी लोकमतमध्ये काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page