कुडाळ /-
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील लेमन ग्रास हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग निरीक्षक अर्चना घारे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ नगराध्यक्षा आफ्रीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर, जिल्हा बँक माजी संचालक व्हिक्टर डान्टस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, बाळ कनयाळकर, भास्कर परब, सावली पाटकर, सचिन पाटकर, रिद्धी परब, संतोष जोईल, देवा टेमकर, राकेश नेवगी, आत्माराम ओटवणेकर, मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, एम. के. गावडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा परिषद माजी सदस्य अमरसेन सावंत, सतीश आचरेकर, दर्शना बाबर देसाई, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, सुनील भोगटे, नजीर शेख, राजन नाईक, संतोष शिरसाठ, किरण शिंदे, बंड्या सावंत, राजू गवंडे, साबा पाटकर आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.
याप्रसंगी बोलताना श्री. भोसले म्हणाले, श्री. सामंत यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करत पक्षाला उभारी दिली. त्यांच्या रुपाने पक्षाला समर्थ नेतृत्व मिळाले. आता आपण सगळ्यांनी त्यांना पक्षवाढीसाठी साथ देऊया, असे आवाहन केले.
