कणकवली /-
कणकवली शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी पुतळा स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, यासाठी तालुका सकल मराठा समाज नेहमीच पाठपुरावा करत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मराठा समाज कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कणकवली भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधिक्षक सुनील परब यांची भेट घेतली. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची जमीन मोजणी झाल्यानंतर पुढील कारवाई काय झाली? याबाबत माहिती घेतली.त्यावर भुमिअभिलेख उपअधीक्षक सुनील परब यांनी सदर प्लॉट सरासरी वीस गुंठे क्षेत्र भरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तातडीची मोजणी आम्ही केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी सदर प्लॉट मोजणी करत शिवाजी महाराज स्मारक व स्टॉल धारकांसाठी जागेच्या उपलब्धतेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
