राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ कोटी ५१ लाख निधी प्राप्त
सिंधुदुर्ग /-
आमदार वैभव नाईक यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवार २१ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नागरिकांची झालेली नुकसान भरपाई शासनामार्फत मिळवून देण्याची मागणी केली. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) बाबत चर्चा करून लवकरच निधी देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. याआधीही आमदार वैभव नाईक यांनी कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी आ.वैभव नाईक यांची मागणी पूर्ण केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत २ कोटी ५१ लाख रु तात्काळ देण्यात आले आहेत. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक जिल्ह्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.