कुडाळ /-
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाच्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमे अंतर्गत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या तोफेची शोध मोहीम यशस्वी करण्यात आली.
लवकरच ही तोफ गडावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे अध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले. दिनांक २१ एप्रिल २०२१ रामनवमी दिवशी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळे रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तिसऱ्या ऐतिहासिक तोफेपर्यंत पोहचले होते. ही तोफ त्रिवेणी ग्रुप कागल यांनी दिनांक २४ व २५ एप्रिल २०२१ रोजी गडावर आणण्यासाठी राबविलेल्या संवर्धन मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक, सावंतवाडी तालुका सरचिटणीस सच्छिदानंद राऊळ, तानाजी कुंभार, समीर धोंड व रोहन राऊळ आदि मावळ्यांनी सहभाग घेऊन या संवर्धन मोहिमेत खारीचा वाटा उचलला. या संवर्धन मोहिमेसाठी त्रिवेणी ग्रुप कागलच्या सुमारे १५ मावळ्यांनी तहान भूक हरपून मेहनत घेतली.