कुडाळ /-
आमदार वैभव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मंडळांना अनेक मंदीराना कोरोना काळात सुरक्षा मिळावी यासाठी थर्मल गन व ओक्सामिटर देण्यात आले याचाच एक भाग म्हणून आज हुमरमळा वालावल रामेश्वर उपसल्लागार उपसमिती हुमरमळा वालावल अध्यक्ष अमृत देसाई यांच्या कडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जि प सदस्य अमरसेन सावंत यांच्या शुभहस्ते आज देण्यात आली आहेत.
हुमरमळा वालावल रामेश्वर मंदीरात भक्तांची रोजच ये जा असते त्यातच महाशिवरात्र उत्सव या वर्षी कोरोनाची खबरदारी स्थानिक उपसल्लागार समीतीने घेऊन उत्सव यशस्वी केला होता यावेळी गावातील ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले होते आरोग्य कर्मचारी यांनी तपासणी टेबल लावुन दक्षता घेतली होती यातच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी या समितीला कायमस्वरूपी थर्मल गन आणि ओक्सामिटर देऊन भाविकांची काळजी घेतली आहे यासाठी हुमरमळा वालावल गावातील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
या वेळी रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समीती अध्यक्ष अमृत देसाई, माजी अध्यक्ष प्रकाश आजगावकर, कमिटी सदस्य प्रकाश तावडे, कमिटी सदस्य मयुर प्रभु, सरपंच सौ अर्चना बंगे, शिवसेनेचे अतुल बंगे, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, भाई कांबळी, युवासेनेचे उपशाखा प्रमुख संदेश जाधव, गणपत गुंजकर उपस्थित होते.