कुडाळ /-
कुडाळ शहरातील तीन पान स्टाँलवर अन्न भेसळ व सुरक्षा विभागाने धाडी टाकल्या.या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये विविध प्रकारच्या गुटख्याचा 3 हजार 952 रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.अन्न भेसळ व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
यात गवळदेव जनरल स्टोअर्स कुडाळ वेंगुर्ले रोड ,महालक्ष्मी पान स्टाँल अँण्ड जनरल स्टोअर्स एस एन देसाई चौक,
व बाबा चाँद पान स्टाँल पानबाजार कुडाळ या तीन स्टॉलवर ही कारवाई करण्यात आली.या स्टाँलमध्ये विमल पान मसाला,आर एम डी पान मसाला, प्रिमीअर नजर गुटखा,व्ही 1 सुगंधी तंबाखू, एम 1 सुगंधी तंबाखू या प्रकारातील एकूण 3 हजार 952 रू चा गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भाजपचे युवा पदाधिकारी चंदन शरद कांबळी, प्रफुल्ल रमेश सामंत व रिआज शेख या तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 272 , २७३, कलम ३२८ ,अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 30 (2) ए नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.