महिला क्वायर क्लस्टर चेअरमन एम.के.गावडे
वेंगुर्ला /-
कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील क्वायर क्लस्टरचे उद्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
ऑनलाइन उदघाटन होणार आहे.यासाठी खासदार विनायक राऊत,खासदार नारायण राणे,आमदार वैभव नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे,अशी माहिती महिला क्वायर क्लस्टरचे चेअरमन
तथा कृषीभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे दिली.
शनिवार २० रोजी लखनौ टीम ने वेंगुर्ले एम्प्लिमेंटिंग एजन्सी महिला काथ्याला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी येथील भव्यदिव्यता पाहून येथील प्रकल्प “केरळ” प्रमाणेच असल्याचा भास झाला असल्याचे सांगितले.यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौ चे डायरेक्टर डॉ.सी. एम.मिश्रा,एन.आय.एस एम. इ. हैद्राबाद येथील सूर्यप्रकाश गौड,महिला क्वायर क्लस्टर चेअरमन -मार्गदर्शक तथा कृषिभूषण एम.के.गावडे,महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.प्रज्ञा परब,क्वायर बोर्ड सिंधुदुर्ग चे विष्णू आदी उपस्थित होते.
यावेळी सी. एम.मिश्रा,
सूर्यप्रकाश गौड यांचा एम.के.गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांनंतर त्यांनी मालवण येथे भेट दिली.त्यानंतर त्यांनी एस.पी. व्ही.मेम्बर्स व सभासद यांच्याशी संपर्क साधला.भविष्यात क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल,याचे अनेक प्रश्न विचारले व केंद्रशासन निश्चित आपल्याला भविष्यातही मदत करेल,असे सांगितले.यावेळी गीता परब,श्रुती रेडकर,अश्विनी पाटील,अरुणा सावंत,पेंडूरकर सर,अमित सावंत,सर्व एस.पी.व्ही.मेम्बर्स व सभासद उपस्थित होते.