वेंगुर्ला /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा,असे प्रतिपादन आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर यांनी येथे केले.सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मत्स्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने सावंतवाडी येथे मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले .यानिमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची ओळख व्हावी,यासाठी महिलांसाठी महिला मोर्चाच्या वतीने
मोफत प्रशिक्षण शिबिराचे साई मंगल कार्यालय – वेंगुर्ले येथे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण,भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,मत्स्य महाविद्यालयाचे डाॅ. आशिष मोहिते, डाॅ. डबीर पठाण, डाॅ. एस्. टी.सारंगधर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, आत्मनिर्भर योजना महिला मोर्चा कोकण प्रतिनिधी रश्मी लुडबे,जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुषमा खानोलकर,शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर,नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, ,अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार,उमा म्हाडदळकर ,कोकण विकास आघाडीच्या प्राची राणे, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
महिलांच्या या मोफत विविध खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले.