कुडाळ /-
कोरोना काळानंतर सुरू झालेल्या शाळा कॉलेजमध्ये मुलांची लगबग सुरू झाली असून. कुडाळ मधील कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेमध्ये वर्ग सुरू झालेत. कुडाळ मधील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात झाले आहेत. यामध्ये मुलींची संख्या देखील जास्त आहे. नुकतीच शंभर वर्षे या प्रशालेस पूर्ण झालीत या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थिनींच्या सोयीकरता प्रशालेमध्ये ऑटोमॅटिक सॅनेटरी पॅड वेंन्डींग मशीन मनसेकडून प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूलचे ज्येष्ठ गुरुवर्य श्री अरविंद शिरसाट सर यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, रमाकांत नाईक, सुबोध परब, हितेंद्र काळसेकर, मुख्याध्यापक श्री वालावलकर सर, श्री हावळ सर ,आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या . प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी पालक यांस कडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.