तब्बल एक वर्षीनी सुमो चोर सापडला पोलीसांच्या ताब्यात..
कुडाळ /-
आंबोली घाटात सुमो चालकाला माराहाण करुन त्याची सुमो कार पळवून नेल्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार पैगंबर सिकंदर शेख याला अखेर कुडाळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. सांगली एलसीबीच्या सहाय्याने कुडाळ पोलिसांच्या विशेष पथकाने येथील त्याच्या सांगली जत येथील घराकडूनच ताब्यात घेण्यात आले आहे.त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
26 सप्टेंबर २०१९ रोजी ही घटना घडली होती एक वर्षाच्या कालावधीनंतर चोरट्याच्या हालचालीवर पोलिसांनी करडी नजर ठेवत अखेर त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
बांदा परिसरातून एक सुमो कार भाड्याने घेत यातून तिघे जण प्रवास करत होते.दरम्यान या तिघांनी सुमो कुडाळ तालुक्यातील पावशी भागात आल्यावर सुमो चालकाला माराहाण करत सुमो चालकासह आंबोली गाठली होती.आंबोलीतही त्याला परत माराहाण करत त्याला सुमो चालकाला तेथेच उतरवून सुमोसह बोबारा केला होता.
मात्र यातील मुख्य आरोपी पैगंबर शेख याच्या मागावर पोलिस होते दरम्यान तो सांगली जिल्ह्यातील जत भागात असलेल्या त्याच्या घरी आला असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली.यानंतर कुडाळ पोलिसांनी सांगली एलसीबीच्या सहाय्याने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.यानंतर कुडाळ पोलीस मंगेश शिंगाडे, फ्रिडम भुतेलो व श्री मळगांवकर याचे पथक सांगली येथे रवाना झाले. यादरम्यान सांगली एलसीबी त्याच्यावर पाळत ठेवून ,सुमारे एक वर्षानंतर आरोपीला पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले असून संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे करत आहेत.