चौके /-
मालवण-चौके मार्गावर आनंदव्हाळ- कर्लाचाव्हाळ या ठिकाणी दोन दुचाकीमध्ये समोरा समोर ठोकर होऊन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका दुचाकीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे.त्यां दोघानाही ग्रामीण रूग्णालय मालवण या ठिकाणी अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. मालवण येथून चौकेच्या दिशेने येणारा टि.व्ही.एस. कंपनीची स्कूटी MH07AC1696 व चौके येथून मालवणच्या दिशेने जाणारी बजाज कंपनीची मोटार सायकल MH07AF0073 या दोन्ही दुचाकी स्वारामध्ये भर दुपारी भीषण असा समोरा समोर अपघात झाला. या अपघातामध्ये टि.व्ही.एस. कंपनीची दुचाकी चालविणारा गंभीर जखमी त्याच्या डोळ्याला व डोक्याला मार लागला आहे. अपघात घडला त्यावेळी या मार्गावरून प्रवास करणारे मंदार गावडे, शेखर गाड, अनिल सुकाळी, भाऊ वाईरकर,सुनिल वरावडेकर, राजन सारंग , सचिन आबेरकर,सुशिल डिचोलकर व अन्य लोकांनी दोन्ही जखमीना मालवण रूग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आले.