✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.

भारतीय पंचवार्षिक योजना ते नीती आयोग या विषयावर लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी व प्लॅनिंग फोरम विभागामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. डॉक्टर संजय खडपकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते, आजची देशाची प्रगती झालेली आहे याचे कारण म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू होय,त्यांनी नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषदेचे मार्फत पंचवार्षिक योजना व राष्ट्रीय विकास धोरण राबविले रशिया या देशाच्या धरतीवर नियोजन आयोग व विकास परिषद स्थापन करून पहिली पंचवार्षिक योजना ते बारावी पंचवार्षिक योजनेमार्फत महत्त्वकांक्षी प्रकल्प भारतात जन्माला घातले, यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी),दामोदर खोरे प्रकल्प ,समुदाय विकास कार्यक्रम ,अणुऊर्जा आयोग, हिराकुड ,भाकरानांगल धरण ,असे महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवून त्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे शेती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर दुसऱ्या योजनेमार्फत औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करून औद्योगीकरणासाठी चालना दिली या योजनांमध्ये विकासाचा दर 9.5% प्रतिवर्ष संपादन करणे जड व मूलभूत उद्योगाला प्रोत्साहन देणे अशी महत्त्वाची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले .यामध्ये दुसरे औद्योगिक धोरण, खादी ग्रामोगाची सुरवात ,भिलाही लोहपोलाद,दुर्गापूर व रूरकेला असे दोन खत कारखाने सुरुवात केले तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व मूलभूत उद्योगावर भर दिला कृषी मूल्य आयोगाची स्थापना, भारतीय अन्न महामंडळाची स्थापना, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ची स्थापना, चौथ्या पंचवार्षिक योजनेत मुख्य उद्दिष्ट स्वावलंबन होते गरीबी हटाव,बेकारी निर्मूलन, पोलाद प्रकल्प,लघु शेतकरी विकास अभिकरण, अवर्षण प्रवण क्षेत्र,विकास कार्यक्रम ,स्टील ऑथॉरिटी इंडिया लि. ,एम.आर. ती .पी कायदा, 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामीण बँक योजना, भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना, फिर कायदा पाचव्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे गरिबी हटाव, किमान गरजांचा कार्यक्रम, कामाच्या बदल्यात धान्य, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना,पहिले लोकसंख्या धोरण, एकात्मिक बाल विकास योजना, वाळवंट विकास कार्यक्रम यानंतर आणीबाणी जाहीर होऊन जनता सरकार अस्तित्वात आले व पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सरकती योजना आणली जिल्हा उद्योग केंद्र ,अंत्योत्य योजना, कामाच्या बदल्यात धान्य.
सहाव्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला 5. 2% विकासाचा दर ठेवून तयार केलेल्या योजनेत एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना ,ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास, नवीन वीस कलमी कार्यक्रम ,विशाखापट्टणम व सालेम पोलाद प्रकल्प स्थापन केले, सहा बँकांचे राष्ट्रीयकरण केले पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, दशलक्षी विहीर योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय साक्षरता मिशन,केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, शिक्षण धोरण, राष्ट्रीय गृह बँक स्थापना ,तिसरा 20 कलमी कार्यक्रम, नेहरू रोजगार योजना, इत्यादी योजना राबवण्यात आल्या.

सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, सलेम लोह पोलाद उद्योग, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांचा विकास, योजना बायोगॅस कार्यक्रम, तसेच ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना, दुसरा 20 कलमी कार्यक्रम अशा प्रकारच्या योजना घेण्यात आला, नंतर सातव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट रोजगार निर्मितीसाठी होते, त्यातूनच तिसरा वीस कलमी कार्यक्रम, इंदिरा आवास योजना, दशलक्षी विहीर योजना, राष्ट्रीय साक्षरता मिशन, खडू फळा मोहीम,केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, बरोबरच राष्ट्रीय गृह बँकांची स्थापना करण्यात आली. आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 73 वी व 74 वी या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या करण्यात आल्या, ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरवणारी योजना, पंतप्रधान रोजगार योजना, मध्यान आहार योजना,संगम योजना, गंगाकल्याण योजना ,आश्वासित मजुरी योजना, यांसारख्या योजना राबविण्यात आल्या. तसेच नववी पंचवार्षिक योजनेमध्ये स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती रोजगार योजना,
, सर्व शिक्षा अभियान, अंत्योदय अन्न योजना, प्रंतप्रधान ग्रामसडक योजना, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, यांसारख्या महत्त्वपूर्ण नवीन योजना करण्यात आल्या. त्याचबरोबर दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 86 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

वंदे मातरम योजना, राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्नयोजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, भारत निर्माण योजना,मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना, त्याचबरोबर भारत अमेरिका नागरिक करार झाला, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम घेण्यात आले. अकरावी पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धी आणि समावेशक विकासाकडे भर देण्यात आला आर्थिक वाढ, शिक्षण पायाभूत सुविधा, दारिद्र्य बेरोजगारी निर्मूलन आरोग्य ,पर्यावरण व शाश्वस्थता यांकडे लक्ष दिले गेले, नंतर
स्वतंत्र भारताच्या 65 वर्षांच्या इतिहासात 12 पंचवार्षिक योजना देणाऱ्या नियोजन आयोगाची जागा आता ‘नीती आयोग’ (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स-फॉर्मिंग इंडिया – NITI) ने घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नियोजन आयोगाचे नामकरण केले.
NITI आयोगाची स्थापना प्रामुख्याने देशात “किमान सरकारद्वारे जास्तीत जास्त शासन” सक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आली
NITI आयोग सरकारला जगातील इतर राष्ट्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या सर्वोत्तम पद्धती भारतीय परिस्थितीनुसार लागू करण्याचा सल्ला देतो.

अशाप्रकारे एकूण बारा पंचवार्षिक योजनांचे विवरण प्रा डॉ संजय खडपकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत अकॅडमीचे प्लॅनिंग ऑफ फॉरेन विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.दरेकर भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.पी.डी गाथाडे हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.पी.एन.ढेपे मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डी.वाय.बर्वे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रा.रोहन बागकर लायब्ररी विभाग प्रमुख प्रा.रामकिशन मोरे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रा.सोपान जाधव वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.आर.एस. इंगळे प्रा.प्रियंका गवस श्री. योगेश ठाकूर,कल्पेश गवस तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रियंका गवस, तर प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.यु.दरेकर यांनी तर आभार प्रा.डॉ.पी.एन.ढेपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page