▪️अन्यथा मोती तलावात जलसमाधी घ्यावी लागेल.;बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांचा ईशारा..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांत रिक्त असलेल्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याबाबत जो शासन अध्यादेश काढला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा डीएड बेरोजगार सावंतवाडीच्या मोती तलावात जलसमाधी घेतील, असा इशारा डीएड बेरोजगार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिला आहे. शिक्षण खात्याच्या वतीने काढण्यात आलेल्या या आदेशाला जिल्ह्यातील डी. एड बेरोजगार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. अशाप्रकारे निवृत्त शिक्षक घेतल्यास जिल्ह्यातील उमेदवारांवर बेरोजगारीचे संकट येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
