✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ शहरात आज सायकाळी ५ च्या सुमारास अनंत मुक्ताई हॉटेल समोर सार्वजनिक सुलभ शौचालय या ठिकाणी एक इसम दुचाकीवरून येऊन गांजा विक्री करणार आहे.अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली त्यावरून सापळा रचून एका आरोपी विरुद्ध कारवाई करून त्याचे दुचाकीचे सीट खालील डिकीत एकूण २ किलो १०३ ग्रॅम गांजा पकडला आहे. ६३,९० रुपये चा गांजा आणि ४०,हजार- किमतीची हिरो duet दुचाकी ८,हजारकिमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण रु.१११हजार ९० रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी विरूद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून कुडाळ पोलीस तपास करत आहेत.सदरची कारवाई सिंधुदूर्ग चे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप कुमार खंडे, कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, अमित तेली यांनी केलेली आहे
आरोपी विरुद्ध गुन्ह्याची फिर्याद प्रमोद काळसेकर यांनी दिली.
