पणदूर गावात माजी खा.निलेश राणे यांच्याकडून विकासकामांची भूमिपूजने..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते आज कुडाळ तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील पणदूर येथील विकासकांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पणदूर गावचे माजी सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, डॉ. अरुण गोडकर, जगदीश उगवेकर, दीपक साईल आदी उपस्थित होते.यावेळी पणदूर गावचे माजी सरपंच दादा साईल यांनी भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पणदूर गावच्या विकासात निलेश राणे यांचा मोठा हातभार असून त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी या गावासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे दादा साईल यांनी सांगितले.येत्या काळात मालवण मतदारसंघातून भाजप नेते निलेश राणे यांना आमदारकीचे तिकीट मिळावे अशी सर्व पणदूर वासीयांची इच्छा असल्याचे दादा साईल यांनी यावेळी म्हटले. पणदूर गावातील उर्वरित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच भाजप नेते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी पणदूर गावच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे सांगत येथील अजून काही अपूर्ण असतील तर आपण यासाठी आवश्यक तो निधी देवू, असे आश्वासन दिले. मागील ८ महिन्यात सिंधुदुर्गात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असून त्यापूर्वी अडीच वर्षे हा जिल्हा वंचित राहिला. केवळ मागच्या अडीच वर्षात राजकीय हेवेदावे दिसून आले.
आता केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून यामुळे विकासकामांना गती मिळेल.मागे
पणदूर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दादा साईल यांचा पराभव झाला तरी खचून न जाता दादा यांनी गावात विकासकामे केलीत, असे गौरोद्गार काढले.भविष्यात पणदूर
परिसरातील अनेक कामे भाजपच्या माध्यमातून केली जातील, असेही आश्वासन यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page