लोकसंवाद /- कुडाळ.

भोगावे येथील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता : आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.भोगावे येथील हॉटेल कोकोशंभाला समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी संकेत यशवंत धुरी रा.वजरट याची मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी १५,०००रुपयाच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.

संशयित आरोपीच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.भोगावे येथील हॉटेल कोकोशंभाला समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी केल्याप्रकरणी दिनांक २१/११/२०२२ रोजी फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार संशयितांवर भा.द. वि कलम १४३,४४७,४२७,३७९,३९५,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केसमधील संशयित आरोपी क्र ३ संकेत यशवंत धुरी याला दिनांक ०३/१२/२०२२ रोजी अटक करून दिनांक ०८/१२/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दिनांक ०८/१२/२०२२ रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करून संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान संशयित आरोपीने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. संशयिताच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीची १५,००० रुपयाच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page