लोकसंवाद /- कुडाळ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेहमेळावा रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ या वेळेत श्री सिद्धीविनायक हॉल, रेल्वेस्टेशन रोड कुडाळ येथे मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र दत्ताराम गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यमासाठी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे निवृत्त प्राचार्य प्रा. भाऊसाहेब गोसावी, नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद वसंत गोसावी, आणि नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे सचिव अमरदिप गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नाथबांधव भगिनींनी व विद्यार्थ्यांनी समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे…
दरम्यान मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सन २०२० – २१ व २२ साली इयत्ता १० वी १२ वी पदवी पदव्युत्तर, पदविका ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले तसेच एन. टी. एस., एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती प्राप्त केलेले व पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरील पात्रतेच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी गुणपत्रीकेची झेरॉक्स प्रत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांकडे दिनांक १८ डिसेंबर २०२२ पर्यंत जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मंडळाने घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धा, गायन स्पर्धा, निबं स्पर्धा यांचाही बक्षिस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्या येणार आहे.
