✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
वनक्षेत्रात गस्त घालणाऱ्या दोघा वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी माजगाव येथील तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार माजगाव येथील वनरक्षक प्रकाश रानगिरे यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपले सहकारी रमेश पाटील यांच्यासोबत आपण माजगाव येथील जंगलात कर्तव्य बजावत असताना दुचाकीने संशयास्पद आलेले तिघेजण हातात कु-हाड व दांडे असे साहित्य घेऊन येताना दिसले. अक्षय सावंत, भुजंग सावंत व जयराम कानसे, अशी त्यांची नावे आहेत. यावेळी त्यांना विचारणा केली असता त्यांनी शिव्या करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यातील एकाने कु-हाड घेऊन आपल्या अंगावर चाल केली. यावेळी सहकारी वनरक्षक पाटील यांनी त्या प्रकाराचे चित्रीकरण केले हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
