✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

शेतकऱ्याला मारहाण झाली आहे. गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने डोक्यात फावड्याच्या दांड्याने हल्ला केल्याचा “त्या” शेतकऱ्याचा आरोप आहे. मधुकर गंगाराम जाधव (६०) रा.. मळगाव असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मळगाव रेशन धान्य दुकान परिसरात देवघेवीच्या वादातून घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.

याबाबत जाधव यांनी दिलेल्या लेकार अर्जात दिलेली अधिक माहिती अशी की, यातील विरोधकाची पडीक शेत जमिन जाधव यांनी खंडावर कसण्यासाठी घेतली होती. या ठिकाणी त्यांनी भातशेती केली होती. मात्र विरोधकांनी अचानक जावून भात कापून आणले. परंतु ती शेती करणाऱ्या जाधव यांना कोणताही मोबदला दिला नाही. त्यामुळे याबाबतची विचारणा करण्यासाठी जाधव हे गेले असता त्याने डोक्यात फावड्याचा दांडा मारल्याचा आरोप केला आहे. यात जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पत्नीसह त्यांनी पोलिसात धाव घेत याबाबतची तक्रार दिली. त्यानुसार उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page