✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातून कोणत्याही उमेदलाराचा अर्ज दाखल झालेला नाही.त्यामुळे आज ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेत भाग घेऊन फ्रॉम भरण्याच्या पहिल्याच दिवशी निरंक परिस्थिती झाली आहे.मात्र उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल,असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातलेले आहेत.या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी कुडाळ आणि सावंतवाडी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
