✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय आणि समान वागणूक दिली आहे या घटनेच्या माध्यमातून लोकांना लोकांचे अधिकार प्राप्त झाले आहेत असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटनेसाठी असलेले योगदान हे सर्वात महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
कुडाळ येथे भाजपच्या अनुसूचित जाती, जमाती मोर्चाच्यावतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा, वाघ, संघटकमंत्री शैलेंद्र दळवी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच विविध जाती, धर्म व संस्कृती असलेला १३० कोटी लोकसंख्येचा भारत देश एकसंघ आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम घटनेने केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कोणावरही अन्याय केलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
