लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

राष्ट्रवादी काँग्रेसचे लढवय्ये नेते तथा आमदार मा, जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन जामीन मंजूर,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी असल्याची आज प्रत्यक्ष भेट घेऊन,आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ग्वाही दिली.

दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल करुन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आवाज दाबण्याचा विरोधकांनी केलेला बनावं माननीय न्यायलयाने हाणून पाडला,न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपचा ढोंगी चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झाला,यापुढे तरी भाजपने आत्मपरीक्षण करुन खोट्या केसेस घालून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचे उपद्व्याप बंद करून महाराष्ट्रात सुरू केलेले सुडाचे राजकारण थांबवून महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावे असा सबुरीचा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी संघटना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page