मैदानावरून न खेळताच महिला खेळाडूंना परत जावे लागले माघारी पालकांमध्ये नाराजीचे सूर.;पालकमंत्री राज्याचे क्रीडा राज्यमंत्री यांचे लक्ष वेधणार..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून कुडाळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये एका महिला संघाचे ऑनलाईन एन्ट्री न झाल्यामुळे त्यांना त्या स्पर्धेत खेळता आले नाही सदर स्पर्धेच्या ठिकाणाहून त्या महिला संघाला माघारी जावे लागले त्यामुळे खेळाडू आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटला संबधित पालकांनी एकवीध संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली व या चर्चेनंतर एकवीध संघटनेच्या माध्यमातून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणी केली या मागणीचा विचार करून एकविध संघटनेचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर व सचिव कृष्णा सावंत यांनी तात्काळ या विषयावर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण व क्रीडा राज्यमंत्री यांच्याशी आपण ताबडतोब चर्चा करणार असल्याची ग्वाही दिली व त्यानंतर कोणत्याही खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन संघटनेच्या वतीने दिले.
