सावंतवाडी/-

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव रेडकरवाडी येथे माल वाहतूक ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक मळगाव रेडकरवाडी परिसरात पलटी झाला. चालकाला झोप आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना पहाटे तीन च्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. महामार्गाच्याकडेला असलेल्या झाडाना अडकून ट्रक वरच्यावरच अधांतरी राहिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page