कुडाळ /-

पंचायत समिती कुडाळ ही आपल्या विविधांगी कार्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात कर्मयोगी ठरलीआहे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरण्याचे श्रेय बिडीओ आणि तुमच्या सर्व टीमला जाते असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ किरण जाधव यांनी आज केले आहे.

राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ किरण जाधव यांनी आज कुडाळ पंचायत समितीला भेट दिली.समितीचे प्रशासकीय तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकरपै ,कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर ,आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर ,ग्रामविस्तार अधिकारी संजय ओरोसकर, आर.डी.जंगले, संजय चौकेकर,रवी पोवार,विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ जाधव म्हणाले औरंगाबाद व कोकण विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे विशेष म्हणजे कुडाळ पंचायत समितीने शासनाच्या विविध योजनामध्ये सातत्याने प्रथम क्रमांकाचे यश मिळवले यशाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे एकूणच या पंचायत समितीचा कारभार पाहता ही पंचायत समिती सर्वांच्या कार्यशैलीने कर्मयोगी ठरली आहे असे सांगत कौतूक केले ते म्हणाले कोणतेही काम करताना प्रशासनात जो बदल घडवून आणायचा असतो तो चर्चेच्या माध्यमातून होत असतो यातूनच खर्‍या अर्थाने आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकतो आर टी एस महाराष्ट्र अँपच्या माध्यमातून महाराष्ट्र विधिमंडळाचे विनियमन, राज्य सेवा हक्क नियमावली, प्रोत्साहनपर ग्रामसेवकांनी चांगले काम केले त्यांचा गौरव या माध्यमातून कशा प्रकारे होत असतो याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत मार्गदर्शन केले आयुक्तालय ते अधिकार व कर्तव्येच्या माध्यमातून राज्यात 35 हजार 543 सेवा केंद्रे असून त्याचा लाभ विविध माध्यमातून होत असतो आरटीएस महाराष्ट्र अँपबाबत अंमलबजावणी करणे, येणाऱ्या अडचणीमध्ये सुधारणा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाटचाल कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले विवाह नोंदणी ,जन्म दाखला ,मृत्यू दाखला याबाबत बोलताना ते म्हणाले विवाह नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन झाली पाहिजे परदेशात विवाहाची नोंद केली जाते मात्र आपल्याकडे भारतात काही भागांमध्ये अजूनही अठरा वर्षाच्या अगोदरच्या मुलीचा विवाह केला जातो मुलीचे 18 व मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण होत नाही याची खातरजमा केली जात नाही तोपर्यंत ऑनलाइन प्रक्रिया होत नाही मात्र विवाह नोंदणी ऑनलाइन झाली पाहिजे हे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी प्रत्येक योजनाबाबत आपण सेवा दिले पाहिजे आपली सेवा आपले कर्तव्य बजावताना आपल्या कार्यकक्षात 83 प्रकारच्या विविध सेवा येतात आपण या सर्व सेवा प्रत्येकाला सेवाभाव वृत्तीने दिल्या पाहिजेत आजच्या कार्यशाळेत प्रायोगिक तत्वावर सात सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे स्पष्ट केले या मार्गदर्शन शिबिरात ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ,आरोग्य विभाग, बांधकाम विभाग ,कृषी विभाग ,शिक्षण विभाग, पंचायत समिती योजना विभाग ,उमेद, पाणी स्वच्छता विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प आदी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

सेवाभाव ही आपली जबाबदारी आहे डॉ जाधव.

कुडाळ पंचायत समितीच्या कार्याचा नावलौकिक पाहता या पंचायत समितीने रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ,बांबू लागवड प्रकल्पामध्ये चांगल्या प्रकारे भरीव कामगिरी केली असल्याचे सांगून यशाची परंपरा कायम स्वरूपी जोपासा ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात सेवाभाव म्हणून काम करा ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्यासारखे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अति जलद सेवा कशी देता येईल या दृष्टिकोनातून काम करणे फार महत्त्वाचे आहे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना सेवाभाव ही आपली जबाबदारी आहे ती कायमस्वरूपी जोपासा असे सांगून स्पर्धात्मकमध्ये यशाची कमान नेहमीच उंचावत ठेवा असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page