कुडाळ/-
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा बोर्डवे
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा घावनाळे नं १
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेरी नं १ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पाट्या वाटप या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक २२ जुलै २०२२ रोजी कणकवली तालुक्यातील *जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोर्डवे* येथील *पाच*, कुडाळ तालुक्यातील *जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा घावनाळे नं १* शाळेतील *पाच* आणि *जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेरी नं १* येथील *नऊ* गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या *एक पाटी गरजू विद्यार्थ्यासाठी* या उपक्रमांतर्गत पाटी वाटप करण्यात आले. (टीप : गरजूंना मदत करताना फोटो काढणे योग्य वाटत नसल्याने प्रत्यक्ष वाटपाचा फोटो काढण्यात आलेला नाही.) या उपक्रमाच्या पाटीसाठी कुडाळ येथील *श्रीमती संपदा कुबडे* यांनी *पाच पाट्या*, कुडाळ येथील *श्री महेश अडसुळे* यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने *पाच पाट्या* आणि कुडाळ येथील *श्रीमती सोनल चव्हाण* यांनी *नऊ पाट्या* सौजन्य केले त्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून खूप खूप आभार.
