सावंतवाडी /-
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा सुद्धा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामागे नेमके कारण समजू शकले नाही. काही वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. हा राजीनामा काँग्रेस प्रदेशयक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी पाठवला आहे.
