कुडाळ शहरात घंटागाडीच्या माध्यमातून होणार प्लास्टिक मुक्तीची जनजागृती.
कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत येथील नियोजित बैठकीत आज दिनांक २१/०७/२०२२ रोजी प्लॅस्टिक बंदी विरोधातील सभेत सर्वानुमते कुडाळ नगरपंचायत हद्दीतील, कुडाळ शहरातील प्रत्येक घरात दोन कापडी पिशव्या देण्यात याव्या यासाठी कुडाळ नगरपंचायत ,कुडाळ तालुका व्यापारी संघटना , सर्व सामाजिक संस्था यांना सहभागी करून कापडी पिशव्या उपलब्ध करण्याचे ठरवण्यात आले.यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि व्यापारी संघटनेशी संपर्क साधावा.नगरपंचायत घंटा गाडीवर प्लास्टिक बंदी विरोधातील जनजागृती करण्यात येईल,प्रत्येक वॉर्ड आणि शहरातील चौकात बोर्ड लावण्यात येईल.कोणीही व्यक्ती प्लास्टिक पिशवी वापरताना दिसली तर दंड आकारण्यात येईल. असे ठरवण्यात आले.
यावेळी या सभेला नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.गाढवे, नगराध्यक्ष सौ.आफ्रिन करोल , उप नगराध्यक्ष श्री. मंदार शिरसाट , व्यापारी संघटना अध्यक्ष श्री. श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष श्री . गोविंद सावंत, खजिनदार श्री. नितीश म्हाडेश्वर , सेक्रेटरी श्री भूषण मठकर , उप सेक्रेटरी श्री. महेश ओटवनेकर , जिल्हा व्यापारी संघटना सदस्य श्री राजन नाईक , व्यापारी बांधव श्री . प्रशांत शिरसाट ,श्री संदेश पडते, श्री कुंटे , श्री प्रसाद शिरसाट ,श्री जालीम पुरोहित , श्री केतन वर्दम , श्री अनंत नार्वेकर , श्री शब्बीर मेमन , श्री चंद्रशेखर काळप आदी व्यापारी उपस्थित होते.
