रत्नागिरी /-
कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नव्याने 11 रेल्वे स्थानके उभारली आहेत. मात्र या स्थानकांवर प्लॅटफॉर्म नसल्याने रेल्वे प्रवाशांची फार गैरसोय होत होती. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने या सर्व स्थानकांवर सुसज्ज प्लॅटफॉर्म उभारावेत अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे रत्नागिरी दौऱ्यावर असताना एका निवेदनाद्वारे त्यांच्याकडे केली होती.
या निवेदनाची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दखल घेतली असून कोकण रेल्वे प्रशासनाला त्यांनी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले असल्याचे पत्र त्यांच्या कार्यालयाकडून मला पाठविण्यात आले असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच प्लॅटफॉर्मचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली आहे.
