मालवण /-
मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या रिटा पिंटो, अंजली पिंटो, टोपीवाला हायस्कुलचे संजय जोशी, देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रज्ञा सावजी या सेवानिवृत्त शिक्षकांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. चारही शिक्षकांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरीचे क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे, सेक्रेटरी अभय कदम, खजिनदार रमाकांत वाक्कर, डॉ. अजित लिमये, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, अॅड. सोनल पालव, संजय गावडे, रंजन तांबे, ऋषिकेश पेणकर आदी उपस्थित होते.
