कुडाळ /-

शैक्षणिक प्रवासात मिळालेलं प्रोत्साहन, गुणगौरव, सत्कार नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतात. यशाच्या दिशेकडे प्रवास करण्यासाठी मिळाली ही एक प्रेरणा, सकारात्मक बळच होय. यासाठीच झाराप ग्रामस्थ मित्रमंडळ आणि परिवार यांनी दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा केला आहे.असे गौरवउदगार सरपंच स्वाती तेडोलकर यांनीआज झाराप येथे काढले .दहावी आणि बारावी च्या गुणवंत विद्यार्थी चा कौतुक सोहळा आज येथील ग्रामपंचायत कार्यल्या च्या सभागृहात संपन्न झाला.यावेळी तेंडोलकर बोलत होत्या. यशस्वी विद्यार्थीना मार्गदर्शन करताना सर्वच
झाराप गावातील या रत्नांचा आम्हाला अभिमान वाटतो.यशस्वी व गुणवंत सत्कार म्हणजे कौतुकाची थाप असते. यशस्वी व्यक्तींना समाजाने शब्बासकीची थाप देणे आवश्यक आहे. मिळालेल्या यशात पालक, शिक्षक,विद्यार्थी यांचे खुप मोठे परिश्रम असतात. मिळालेल्या यशाला समाजाने कौतुक करुन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.विविध स्तरावर विद्यार्थी घडत असतो.त्याला प्रोत्साहन देण्या साठी च आज चा हा कार्येक्रम आहे.” असे त्या म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक दिलीप तेंडोलकर, माजी सरपंच रामा पावसकर, माजी उपसभापती बबन बोभटे, यज्ञेश गोडे, राजेंद्र तेंडोलकर,दक्षता मेस्त्री, मनस्वी घाड़ी ,पोलीस पाटिल सुरेश चव्हाण,माजी पोलीस पाटील सुरेश गावकर, अनिकेत तेंडोलकर , नितिन कुडाळकर, वैभव हरमलकर, नरेंद्र बिड़ये, प्रसाद गोड़े, चैताली कुडाळकर, युवा परिवर्तन चे अमोल गुराम, रघुनाथ मयेकर आदि मान्यवर.तसेचं मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्येक्रमा ची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थिती मान्यवराना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दहावी आणि बारावी यशस्वी विद्यार्थी ना सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवारान च्या हस्ते सत्कार करण्यात आला एक-एक विद्यार्थी व्यासपीठावर येऊ लागले. त्यांना मिळालेले गुण ऐकून उपस्थितांच्या भुवया कौतुकाने उंचावत होत्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली जात होती.

यावेळी युवा परिवर्तन चे अमोल गुराम यांनी आपल्याकड़े केंद्र सरकार मार्फत घेतले जाणारी विविध प्रशिक्षण यांची माहीती दिली. विद्यार्थी हा गुणवंत असल्याने त्याला परिश्रमाची आवड आहे.त्यामुळे तो कोणत्याही क्षेञात यश मिळवु शकतो. फक्त त्याला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्याबद्दल जागृत राहुन फक्त चालणार नाही.त्याला नवनवीन वाटांची जाणीव करुन दिली पाहीजे. त्याला स्वत:ला त्याच्या क्षमतांची जाणीव होवू देण्यासाठी त्यांच्या विचारांना,कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करावा.”असे विचार आपल्या मार्गदर्शनातून त्यानी मांडले.
याप्रसंगी माजी उपसभपती बबन बोभाटे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या यशाकडे जाताना सीएटी व नीट सारख्या परीक्षा देताना अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.पालकांनी दहावीप्रमाणे बारावी पर्यंतची परीक्षा उत्तीर्ण होत पर्यंत त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” दहावी च्या सेजल पवार आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी चैताली तेंडोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कर्येक्रमा चे बहारदार सुञसंचालन वैशाली खानोलकर आणि नितिन गोलतकर यांनी केले.

आपल्या आई वडीलांच्या, शिक्षकांच्या कष्टाचा विसर पडू देवू नका. जिद्द, चिकाटी, प्रयत्न या तीन गोष्टी सोडू नका असंही पोलिस पाटील सुरेश चव्हाण यांनी सांगितले शिक्षणा साठी आवश्यक ते दाखले मिळवण्यासाठी मी तुम्हाला सर्वाना सहकार्य करेन. असे ही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी स्वताची ओळख निर्माण करा. आपल्यावरुन पालकांची ओळख निर्माण करा असं यावेळी उद्योजक दिलीप तेंडोलकर म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर पावलोपावली विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा कठिण परिस्थितीत मुलांना धीर द्या असे पालक तेंडोलकर म्हणाल्या.भविष्यात झाराप गांव चे विद्यार्थी उच्च पदावर काम करताना दिसतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला. उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page