देवगड /-
देवगड तालुक्यातील तारामुंबरी स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत बसून पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.देवगड तालुक्यामध्ये गेली काहि दिवस अधून मधून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु असल्यामुळे सोमवारी सकाळी तारामुंबरी संतवाडा येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून सुमारे 50 हजार रुपयांची हानी झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून घराच्या भिंतीचेच नुकसान झाले आहे.
सोमवारी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत तारामुंबरी संतवाडा येथे राहणाऱ्या स्नेहा मनोहर तारकर यांचे घराची भिंत पावसाच्या पाण्याने कोसळल्याने घराचे किरकोळ नुकसान झालेले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेले नाही. घरात राहणाऱ्या वयोवृद्ध महिला नामे स्नेहा मनोहर तारकर वय 70 ह्या एकट्याच राहत असून सदर नुकसानीचा पंचनामा मा. तहसीलदार देवगड यांना कळवून करून घेण्यात आलेला आहे. यावेळी तारकर यांना पोलीस ठाणे मार्फत गृहपयोगी वस्तू देऊन मदत करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे पोलीस पाटील खवळे यांनी भेट देऊन पाहणी केली. वयोवृद्ध महिलेला धीर देत देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी गृहपयोगी वस्तूंची मदत केली आहे. यावेळी हवालदार राजन जाधव उपस्थित होते.
आतापर्यंत देवगड परिसरातील पावसाची नोंद मंगळवारी सकाळी १० वा. पर्यंत ११६१ मि. मी. एवढी झाली असून मागील २४ तासात ४५ मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. दरम्यान तालुक्यातील काही भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वहातुक खोळंबली यात वाडा येथे पाणी रस्त्यावर आले परंतु पाणी ओसरल्यावर वहातुक सुरळीत झाली. पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भागात भेट देऊन माहिती घेतली. या पावसात मंगळवारी सकाळी तारामुंबरी संतवाडा येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले. महसूल प्रशासनाला याची महिती प्राप्त होताच तलाठी डी. बी. देशमुख यांनी रीतसर पंचनामा करून रु ५० हजार नुकसानीचा अंदाज वर्तविला आहे.
