कुडाळ /-

कुडाळ तालक्यातील तलाठी कार्यालय तुळसुली तर्फ माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग येथील कार्यरत असलेले तलाठी यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग मार्फत कारवाई करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत गुन्हा नोंद क्रमांक करण्यात आला आहे.कलम १०२ / २०२२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) लोकसेवकाचे नाव व कार्यालय ,चे कलम ७, ७ अ प्रमाणे.श्री. बाळासो शामराव शिंदे, तलाठी सजा तुळसुली तर्फ माणगाव,ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, वर्ग-३) मागितलेल्या लाचेची रक्कम ३,०००/- रूपये एवढी आहे.

या विषई आधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांनी तुळसुली तर्फ माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे सुमारे ५ गुठे जमीन दिनांक ०७/०१/२०२२ रोजी कायदेशीर खरेदी खताने खरेदी केली. खरेदीखताप्रमाणे ७/१२ च्या अभिलेखात नोंद होणेकरीता खरेदी खताची प्रत तलाठी कार्यालय तुळसुली तर्फ माणगाव, ता. कुडाळ येथे दिनांक ०७/०१/२०२२ रोजी दिली. दिनांक १२/०५/२०२२ रोजी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय | तुळुसली तर्फ माणगाव येथे जावुन तलाठी श्री. शिंदे यांची भेट घेवून ७/१२ संदर्भात विचारपूस केली असता, त्यांनी ७/१२ तयार झाला नसल्याचे सांगुन तक्रारदार यांचेकडे १०००/- रुपयांची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लोकसेवक श्री. शिंदे यांची अॅन्टी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग यांचेकडे दिनांक १२/०५/२०२२ रोजी लेखी तक्रार दिली होती.तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने दिनांक १२/०५/२०२२ रोजी सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून या लाजेच्या मागणीची पडताळणी केली असता लोकसेवक श्री.शिंदे, तलाठी सजा तुळसुली तर्फ माणगाव यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा चे अभिलेखात नोंद करून सातबारा देणेकरीता तक्रारदार यांचेकडे स्वत: करीता १०००/- व मंडळ अधिकारी पास्ते यांचेकरीता २०००/- अशी एकुण ३०००/- रूपये लाचेची मागणी केलेली आहे.म्हणून दिनांक ०१/०६/२०२२ रोजी लाकसेवक श्री. बाळासो शामराव शिंदे,तलाठी सजा तुळसुली तर्फ माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, वर्ग-३ यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी लोकसेवक शिंदे हे सध्या नजरेआड असुन त्यांचा शोध चालु आहे.वरील कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री दिपक कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला,पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री जनार्दन रेवंडकर, श्री. निलेश परब,श्री. रवी पालकर, श्रीमती कांचन प्रभू, पोलीस नाईक श्री प्रथमेश पोतनिस, अजित खंडे व चालक पोलीस नाईक श्री. जितेंद्र पेडणेकर,अॅन्टी करप्शन ब्युरो, सिंधुदूर्ग यांचेकडून करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page