कुडाळ /-
एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पदाधिका-यांची निवड आज करण्यात आली. 2022 ते 2025 या कालावधीसाठी झालेल्या या निवडीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून श्री. समाधान परब ,सचिव म्हणून श्री. सुधीर ठाकूर तर खजिनदार म्हणून श्री .देवदत्त साळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली .खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडीमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मागील काही काळाचा शिक्षण संस्थेचा अनुभव आहे .भावी काळातही विविध उपक्रम राबविण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. माध्यमिक विद्यालय, जुनियर कॉलेज ,सीनियर कॉलेज याशिवाय विविध विषयांचे कक्ष संस्थेच्या आधिपत्याखाली असून काळानुरूप होणारे बदल संस्थेने स्वीकारलेले आहेत .पंचक्रोशी च्या आणि मुलांच्या हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असे निर्णय पुढील काळात घेऊन पंचक्रोशी चा विकास करण्याच्या दृष्टीने या शिक्षण संस्थेचा प्रयत्न राहील असे सचिव श्री सुधीर ठाकूर यांनी सांगितले . या निवडी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.,
