कणकवली /-

मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे येथे अवैध दारू वाहतूकीवर एक्साईजच्या कणकवली पथकाने कारवाई करत ३३ लाखांच्या अवैध दारुसह ४५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थान येथील मोहनलाल शंकरलाल जोशी (वय ४२ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.

आज २७ मे रोजी सकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. चॉकलेटी रंगाच्या सहाचाकी टाटा कंपनीच्या बॉडी एलपीटी- ११०९ टेम्पो क्रमांक MH-04/HD-9531 याला लावलेले सील तोडून आत तपासणी केली असता टेम्पोमध्ये केमिकल बिलाच्या नावाखाली चोरट्या पद्धतीने वाहतूक करत असलेले गोवा बनावटीच्या दारूचे ३३ लाख ६० हजार किमतीचे ३५० बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच याकामी वापरण्यात आलेल्या १२ लाख किमतीचा टेम्पो आणि मोबाईलसह एकूण ४५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली निरीक्षक प्रभात सावंत यांनी यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईमध्ये सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवेसकर, शिवशंकर मुपडे, यांनी सहभाग घेतला. मदतनीस म्हणून श्री. खान, श्री. शहा यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page