कुडाळ /-

देवळात देव शोधण्यापेक्षा मी माणसात देव शोधतो आणि अशी माणसे मला मिळाली जी माझ्यावर अपार प्रेम करतात असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले तसेच त्यांनी सांगितले की मनोरंजन होत राहील पण पोटापाण्यासाठी नोकरी धंदा केला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

कुडाळ येथे विशाल परब मित्र मंडळ यांच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील एस टी बस आगाराच्या मैदानावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले यावेळी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, उद्योजक विशाल परब, जिल्हा बँक संचालक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, समाज कल्याण सभापती व मागासवर्गीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, विवेक मांडकुलकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभी गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, प्राजक्त बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की मला साथ देणारे माझे मित्र मिळाले आणि ते देवाच्या कृपेने चांगले मिळाले विशाल परब हा आपला कधीही वाढदिवस साजरा करत नाही पण माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करतो त्याने जी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे याकडे फक्त मनोरंजनात्मक बघू नका तर या खेळा मधून आपण कसे घडू शकतो याकडे लक्ष द्या तसेच रोजगारही तेवढाच महत्त्वाचा आहे मनोरंजनाबरोबर आपल्या पोटापाण्याचे सुद्धा बघितले पाहिजे त्यासाठी नोकरी व्यवसाय सुरू करा असे त्यांनी यावेळी सांगितले तर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे कुटुंबाचे नाव घेतल्याशिवाय कोणीही मोठा होऊ शकत नाही ते सकारात्मक असुदे किंवा नकारात्मक कारण महाराष्ट्रामध्ये राणेंची काय क्रेज आहे ही पु-या महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्रात कुठेही राणे गेले कि गर्दी नाही असं होत नाही अशाप्रकारचा नेता आमच्याजवळ असला असता तर आमच्या लोकांनी डोक्यावर घेऊन नाचले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बक्षीस वितरण झाले संपन्न

कुडाळ येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक फोंडाघाट पंचक्रोशी, द्वितीय क्रमांक वालावल लक्ष्मी नारायण संघ, तृतीय क्रमांक सावंतवाडी जय महाराष्ट्र, चतुर्थ क्रमांक कोळशी सिंधू पुत्र संघ, यांनी क्रमांक मिळवले तर उत्कृष्ट खेळाडू आकाश पाटील (फोंडाघाट पंचक्रोशी) उत्कृष्ट चढाई गिरीश चव्हाण (वालावल लक्ष्मी नारायण) उत्कृष्ट पकड गुरु पाटकर (वालावल लक्ष्मी नारायण संघ) यांना पारितोषिके देण्यात आले हि पारितोषिक वितरण भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page