सिंधुदुर्ग /-
जिल्हा बँक निवडणुकीत आम.नितेश राणे हे संतोष परब हल्ल्यात अडचणीत आल्यानंतर भाजपचे माजी मंत्री तथा आ. रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती.अगदी शेवटच्या 6 दिवसांत आ. रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली आणि भाजपाची सत्ता जिल्हा बँकेवर आणण्यात रवींद्र चव्हाण यशस्वी ठरले आहेत. आ. रवींद्र चव्हाण यांचे पूर्वाश्रमीचे मित्र असलेले अनेक निकटवर्तीय अन्य पक्षात आहेत. सर्वपक्षीय मित्रांशी असलेले संबंध आ रवींद्र चव्हाण यांना जिल्हा बँक निवडणुकी च्या विजयात कामी आलेले आहेत. वेंगुर्ले तालुका मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मनीष दळवी हे संतोष परब हल्ल्यात अटकपूर्व जामीन न मिळाल्याने निवडणूक प्रचारा पासून दूर होते. मात्र मनीष दळवी यांच्या विजयासाठी आ. रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्लेत अहोरात्र मेहनत घेतली. काहीही झाले तरी जिल्हा बँकेवर भाजपाचीच सत्ता आणायचा चंग रवींद्र चव्हाण यांनी बांधला होता. रवींद्र चव्हाण यांची चाणक्य नीती कामी आली आणि अखेर 19 पैकी 11 जागा जिंकून भाजपाने जिल्हा बँकेवर निर्विवाद सत्ता मिळवली आहे.