मुंबई /-
औद्याेगिकीकरणाला सातत्याने बसणारी खीळ आणि इतर क्षेत्रांमध्ये न झालेली प्रगती यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा गरिबीत राज्यात २० व्या स्थानावर आहे. कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.निती आयोगाने देशातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग गरिबीत २० व्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या संधी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिकांचे मुंबईकडे स्थलांतर सुरूच आहे.कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग राज्यात २० वा आहे.रत्नागिरी राज्यात १३ वा आहे, रायगड जिल्हा राज्यात २१ वा आहे, तर मुंबई हा कोकण विभागातील सर्वांत श्रीमंत जिल्हा आहे.राज्यातील सर्वांत गरीब जिल्हे म्हणून पहिल्या दहा क्रमांकात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. यात नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.