कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते परशुराम गंगावणे यांना पुष्पहार घालून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
आदिवासी लोककलेची वृद्धि व्हावी यासाठी जिल्हा नियोजन मधून परशुराम गंगावणे यांच्या सेवांगनास 25 लाख रुपयांची मदत पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यावतीने
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, समन्वयक सुशील चिंदरकर,पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, दिनेश गोरे,सचिन काळप, रूपेश पावसकर,राजू गवंडे, मंजू फडके,चेतन पडते, संतोष अडुळकर आदी उपस्थित होते.