भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी देवेंद्र नाईक यांची निवड..

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी देवेंद्र नाईक यांची निवड..

कुडाळ /-

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी चेंदवण गावचे माजी सरपंच व चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक याची निवड भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग व भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक राहुल वैद्य यांनी केली आहे. श्री नाईक यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात दशावतार लोकलेतुन दिलेले योगदान लक्षात घेता त्याची ही निवड केली आहे. कलेच्या माध्यमातून त्यांना राज्यपातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय ते एक नामंजूर मूर्तिकार आहेत. भाजपचे ते कुडाळ तालुका उपाध्यक्ष आहेत. त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक वृध्दीगंत कशी होईल या टुष्टीने सर्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..