कणकवली /-

कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चॉपरने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. त्या तरुणाच्या पोटात चॉपरने वार करण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रसंग सावधान राखल्याने त्या तरुणाचे प्राण वाचले आहेत.पोटावरील वार कानावर गेल्याने बाका प्रसंग टळला आहे. कणकवली शहरात एका खाजगी बाळा रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चॉपरने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. त्या तरुणाच्या पोटात चॉपरने वार करण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रसंग सावधान राखल्याने यात हा युवक बालंबाल बचावला. मात्र त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तेथील लोकांनी आरडाओरडा केल्याने संशयित आरोपीने पलायन केले. तसेच जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे. याबाबत उपलब्ध माहितीनुसार हा युवक एका मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचे चालक म्हणून काम करतो. हरकुळ बुद्रुक येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हरकुळ बुद्रुक येथील संशयित आरोपीने त्याच्या घराजवळ जात आज दुपारी ​११.३० वाजण्याच्या सुमारास जळकेवाडी त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात हा युवक बालंबाल बचावला. पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भरदिवसा कणकवली शहरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page